Tuesday, September 17, 2013

एक हृदयस्पर्शी कथा

एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती. थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया’त जाऊन पुस्तक वाचत बसली. तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. शेजारी बिस्किटाचा पुडा होता. तिने एक बिस्कीट खाताच त्यांनी ही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊनखाल्ले. त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला.“काय निर्लज्ज मनुष्य आहे हा! माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!’ ती मनात विचार करत होती. दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. आता शेवटचे बिस्कीट उरले.“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, का मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’ ती विचार करत होती. “”आता हे अतिच झालं,” असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली. थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली. पाहते तर काय, तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता. आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, याची तिला खूप लाज वाटली. एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर टाकली, तर शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते. निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते.दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईटबोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का ? कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात....!!!

Thursday, June 2, 2011

Without inspiration the best powers of the mind remain dormant. There is a fuel in us which needs to be ignited with sparks.

Thursday, February 21, 2008

वाटा

कोणास कधी कळतात वाटा
वेड्या कोठून कश्या वळतात वाटा।

एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना
सोडूनी हात कधी पळतात वाटा।

पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते
जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा।

पाहूनी त्या वळणावर आसवांना,
काळोखाआड कधी गळतात वाटा।

कोणी बोले दुनिया तर गोल आहे
फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा?

तीही सोडून मला वळनात गेली
तीच्या वाचून मला छळतात वाटा।

हो येथेच सुरवात , इथेच अंत
(कीती प्रवास असे गिळतात वाटा।)

Monday, January 28, 2008

दोन मिनीटे

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी

Thursday, January 10, 2008

गालावर खळी डोळ्यात धुंदी

गालावर खळी डोळ्यात धुंदी

ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो एका इशार्‍याची
जाऊ नको दुर तू
अशी ये समोर तू
माझा रंग तू घे
तुझा रंग मला दे
गालावर खळी…. रंग मला दे ॥१॥

हो कोणता हा मोसम मस्त रंगांचा
तुझ्या सवे माझ्या जीवनी आला
सूने सूने होते किती मन माझे
आज तेच वाटे धुंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाही मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खरे
तुझ्यासाठी जीव झुरे
मन माझे थरारे
कधी तुझ्या पुढे पुढे
कधी तुझ्या मागे मागे
करतो मी इशारे
हे जाऊ नको दुर तू…. तुझा रंग मला दे ॥२॥

हो तुझ्या पापण्यांच्या सावली खाली
मला जिंदगी घेऊनी आली
तुझ्या चाहूलीची धुन आनंदे
अंतरास माझ्या छेडूनी गेली
जगण्याची आता मज येई नशा
तू माझे जीवन तू माझी दिशा
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादू
गिरीहुर हुर का जिवालाबोल आता काही तरी
भेट आता कुठेतरी
कसला हा अबोलाहे जाऊ नको दुर तू….तुझा रंग मला दे ॥३॥

एक दिवस असा होता की...

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

एकमेकांना, दिलेल्या दुःखांवर एकमेकांसोबत, घालवलेल्या
अनेक आनंदी क्षणांचा, लेप लावण्यासाठी..
आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

अनेक जुन्या, आठवणींनी आणलेले
एकमेकांच्या, डोळ्यातील आनंदाश्रु पुसण्यासाठी…..
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

आयुष्यात पुढे येणारया, अनेक दुःखी क्षणांच्या वेळी
एकमेकांच्या हातात, चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!
आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

प्रत्येक दुःखी, क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात
एकमेकांचा, हात धरण्यासाठी एकमेकाला, सावरण्यासाठी…………
आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!