Friday, December 7, 2007

काचेची बरणी व २ कप चहा

(आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.)तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना कही वस्तू बरोबर आणाल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी कही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात पिंगपाँगचे बॊल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॊक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणुन विचारले. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले. मुलांनी तबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले २ कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी कही जागा होती ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थांमधे एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले,"आता ही जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा.पिंगपाँगचे बॊल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - ह्या आशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सरं कही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपुर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर, कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी." "आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॊल किंवा दगड खडे ह्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा... आपल्या सुखासाठी म्हत्वचं काय आहे त्याकडे लक्श द्या." "आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडिकल चेकअप करुन घेण्यासठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेउन बहेर जेवायला जा. घराची सफाई करायला आणि टाकऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमी वेळ मिळत जाईल." "पिंगपाँगचे बॊलची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे."सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं,"यात चहा म्हणजे काय?" सर हसले आणि म्हणाले,"बरं झाले तु विचारलेस. तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की आयुष्य कीतीही परिपुर्ण वाटले तरी मित्रांबरोबर १-२ कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते"

मन..

संवाद तुटत चाललाय,मना मनातला.
कल्लोळ होतोय भावनांचा, मना मनातल्या.
कुठे जावे कळत नाही या मनाला.
शेवटी आपल्याच पायात घुटमळते आहे घेत शोध
मनातल्या मनाचा.
मन एक वसन, धारण केलेलं मिरवायचं तरी किती?
फ़ेकुन द्याव वाटल तरी संभाळाव किती?
मन नाजुकसा हार, जणु गुंफ़लेली मोत्याची माळ
तुटली जर ती तर जोडावी कशी?
मनात उरलाय फ़क्त आता खोलवर अंधार,
जाणिव भुयारात असल्याची,
त्यात उजेडाला पणती लावावी तरी कशी?

Mandhol Dam


Hareshwar Temple, Karjule Harya







With siblings


Water Fall, Bhushi Dam


On Jinjira Fort


Water Jump, Lonavala


A winter in SajjanGad