Sunday, April 15, 2018

Lesson for Life.

एक प्रसिद्ध वक्त्यांने
हातात ५००/- रूपयाची नोट दाखवत
आपल्या सेमिनारची सुरुवात केली.
हॉल मध्ये बसलेल्या सैकड़ों लोकांना
त्याने विचारले,
ही ५००/- रुपयाची नोट कोणाला पाहिजे?

हॉल मध्ये बसलेल्या खूप लोकांनी हात वर केले.
तो म्हणाला,
मी ही नोट या हॉल मधील
कोणा एका व्यक्तीलाच देईन
परंतु पहिले मला हे करुद्या.
आणि त्याने ती नोट चुरगळली
आणि तो म्हणाला,
आता ही नोट कोणाला पाहिजे?

तरी सुद्धा हॉल मधील लोकांनी हात वर केले.
अच्छा तो म्हणाला,
आता मे हे करू का?
आणि त्याने ती नोट खाली फेकून दिली
आणि तो ती नोट पायाने तुडवू लागला.
त्याने ती नोट उचलली
तर ती नोट खूप चुरगळली होती
आणि खूप घाणही झाली होती.
वक्ता म्हणाला की अजूनही कोण आहे की
त्याला ही नोट हवी आहे?
तरी सुद्धा हॉल मधील लोकांनी
पुन्हा हात वर केले.
मित्रांनो,आज आपण खूप महत्त्वाचा धडा शिकलात.

कारण मी या नोटे बरोबर
खूप काही केल तरी देखील
ही नोट तुम्हाला हवी आहे
कारण या नोटेची किंमत
अजूनही ५००/- रुपयेच आहे.

जीवनात आपण
खूप वेळा पडतो, हरतो,
कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय
आपल्याला मातीत घेऊन जातात.

त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की
आपली काही किंमत नाही.

परंतु
जीवनात तुमच्या सोबत
किती वाईट घडले असुद्या
किवा भविष्यत घडूद्यात,
म्हणून तुमची किंमत कमी होत नाही.

तुम्ही खूप अनमोल आहात
ही गोष्ट कधी विसरू नका.

एक लक्षात ठेवा.
जे भूतकाळामध्ये घडले
त्याचा विचार करून
येणारे भविष्य खराब करू नका.
ज्यांच्याकडे बुद्धीमत्ता आहे,
क्षमता आहे ,
जे नेहमीच इतरांशी चांगले वागतात,
ज्यांच्याकडे जीवाला जीव देणारं कुटूंब आहे,
आणि जे लोक आपल्या आयुष्यात
आनंदी व सुखी समाधानी असतात
अशा लोकांना
जग नेहमीच त्रास देण्याचा प्रयत्न करते.
त्यांचा द्वेष केला जातो.
प्रसंगी बदनामी करण्याचाही
प्रयत्न केला जातो.
परंतु ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो
असे लोक कधीच विचलित होत नाहीत.
कारण जगाने नावं ठेवल्याने
कोणाचे व्यक्तीमत्व खराब होत नाही.
म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा.
जग काहीही म्हणू द्या.
कारण आपल्याकडे
खूप किमती गोष्ट आहे
आणि ते म्हणजे
आपले अनमोल जीवन.

ते आनंदाने आणि सुखात जगा.
संकलन : आजातु.

Thursday, April 5, 2018

तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.
😄😅😀
त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदिलात दिवस काढले.
😌
चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या.
😌
चालून चपला झीजवणारी हि शेवटची पिढी.
😌
लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी हि पिढी.
😌
लसून कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी हि पिढी.
😌
रानात दाना दाना वेचूनहि चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखून ठेवणारी हि माझ्या आई बापाची पिढी.
😌🕊🕊🐤
ठिगळ लावून जगणारीही हि शेवटची पिढी.
😌
कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात  हे तत्वज्ञान जगणारी हि शेवटची पिढी.
😌
कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजहि नव्हता.
😌
माझ्या पिढीने बंद पडलेले टीवी कधीच भंगारात विकले नाहीत.
😌
बापाचं घड्याळ घालून आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या
😌
संपलेले सेल फोडून आम्ही खेळगाड्या बनवल्या.
😌
ग्याटर आलेले टायर गल्लीबोळातून पळवत तरुण झालो.
😌
तुटलेल्या कॅसेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रिमची कोळपी बनवून  आमच्यातले काही इंजिनियर झाले.
😌
आमच्या पिढीत मोठ्या भावाकडून वारसा हक्काने वापरून जुन्या झालेल्या वस्तू लहान भावांकडे आल्या.
😌
तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळे केले नाही.
नाती नात्याला आणि माणसं माणसांना या ना त्या कारणाने कायम जोडलेली होती.
😌
पण आता मात्र....
गाव पार पार हरवलं.
घरोघरी तंत्रज्ञान घुसलं.
😌
रिचार्ज वाढले talktime संपला.
पिक्सल वाढले जगण्याचा एक्सल कमी झाला.
😌
बघता बघता पिढी फोर जी झाली.
प्रत्येकाचं आयुष्य हि ज्याची त्याची मर्जी झाली.
😌
जगणे मल्टीप्लेक्स झाले.
चौका चौकात पुढा-यांच्या पराक्रमाचे फ्लेक्स आले.
😌
आता तर तो हरवलाय म्हणून पेपरात जाहिरातही देता येत नाही.
कारण हल्ली कळून चुकलंय, गेलेली गोष्ट परत येत नाही,मग ते बालपण असो किंवा गावपण.
या गावाला चूड लावली म्हणून आपण कुणाच्या नावाने खडे फोडायचे ?
😌😟
या तंत्रज्ञानाच्या ? कारण तो बदलताना आपल्याला गुदगुल्या झाल्या.
तो हरवतानाही आपण होतोच आसपास.
😥
दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही.
गावपण हरवायला नको होतं.
    😔😔👏👏👏😔


(Copy of original thoughts it's not mine)

Tuesday, April 3, 2018


         *बोधकथा*

        एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती .
आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत .

एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .
ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .
अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.
म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला.
प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.

शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*

प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.
असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.

आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना
तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी *विजेचा कडकडाट* होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच *भस्मसात* झाले.

*तात्पर्य :-*

*एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे* आजही चार पापी माणसं जगु शकतात. 
पण त्याने *साथ* सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.

म्हणून *पुण्याचा वाटा* नेहमी घेत रहा.
ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार.
🌹

Monday, April 2, 2018

💐खरचं लोकांची मानसिकता कुठे चालली आहे...

🌺साईंच्या देवळात
गेलो होतो... दर्शन घेऊन बाहेर आलो न् समोरच्या ठेल्यावर उसाचा रस घेत होतो,🍀
तिथेच बाजूला हाराच् दुकान पण आहे..🌴.

🌹एक चांगला पस्तिशीचा इसम तिथे आला..
त्याने अगदी 250 चा सुन्दर हार घेतला...🌴

🌸तेवढ्यात त्याच्या कड़े एक गरीब मुलगा आला,
याच त्या मुलाकडे लक्ष नव्हतं.. तशी काही गरज पण नव्हती... 11 वर्षाचा असेल तो मुलगा... त्याने त्या इसमाच्या हाताला स्पर्श🍒
केला तो त्याने त्याच्या कड़े पाहिले आणि अगदी दूर ढकलत, स्वतःचा हात रुमालाने पुसला...🍇🌷

🌿पण तो मुलगा अगदी रडवा चेहरा करुन् त्याच्या कड़े पाहत होता, त्याचे डोळे पाणावलेले होते आणि तो पैसे मागत नव्हता...🌺
💐तर 1 ग्लास उसाचा रस त्याच्याकडे मागत होता...
तहान लागली आहे बोलत होता..☘

🍀🌷पण त्या इसमाला काही पाझर फुटला नाह.
ते पाहुन, मी रस वाल्याला सांगितले,
त्या मुलाला रस दे, पैसे मी देतो...🌺

🍎तो मुलगा रस प्यायला आणि माझ्या कड़े क्षणभरचं पाहिलं.. एक स्मित हास्य आणि पळाला...💐

🌷🍀तहान भागल्याच् सुखं त्याच्या
कोवळ्या चेहऱ्यावर स्पष्ट जानवलं...

तोवर या इसमाचा ego दुखावला होता...🌺🌸
तो मला बोलला..
"आप जैसे लोग इन भिकारियों को सर चढ़ाते हो..."🍇

🍅🍅मी त्याला बोट दाखवलं... तो मुलगा पुढे जाऊन मंदिराचे जीने पुसतं होता...

💐💐एवढच बोललो...
"आपको साईं के मूर्ती में
भगवान् दिखता है, जिसके लिये आपने 250 का हार लिया..
और मुझे उस बच्चेके हँसी में साईं मिल गए..💐💐
आपका भगवान् 250 में भी नहीं हँसा😎,
लेकिन मेरा साईं 10 रूपयों में हँस दिया..."

🌺🌺माहित नाही मित्रांनो.. पण हे लिहिताना देखिल माझे डोळे पाणावले...
कुठे आहे माणुसकी...?
कुठे चालली आहे भक्ति..?🌹🌹

🍅जो साईं जिवंत असताना, भिक्षा मागून आणायचा आणि ती देखिल वाटून खायचा
त्या साईंच्या भक्तांना त्यांचा साधा आदर्श देखिल पाळता येऊ नये...??
New look of Mandohal Dam...

Sunday, April 1, 2018

दशक्रिया

एकदा पैंठणला एका ठीकाणी दशक्रिया विधी चालु
असतो. लोक अजुबाजुला बसलेली असतात.
घरचे लोक रडतच मेलेल्या माणसाबद्दल चांगल बोलत असतात. शेजारीच न्हावी वारसाची डोकी भाद्रत असतो. एका पत्रावली वर चार पाच भाताचे गोळे ठेवलेले असतात आणि तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला एकदम मळकट असा दाढी वाढलेला वयस्कर माणुस तिथ येतो आणि भटजी कडे विनवणी करतो की मला खुप भुक लागली आहे. दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही माझ्यावर दया करा आणी समोर ठेवलेल्या भाताच्या गोळ्यातील एक गोळा मला द्या. हे ऐकुन भटजी संतापतो. भटजीच बोलण ऐकुन लोक ही त्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर जातात पण अगदी मळकट लेला आणी भिकारी दिसतोय म्हणुन त्याला हाकलून देतात. तरी पण तो माणुस परत विनवणी करतो. आहो दोन दिवस उपाशी आहे धर्म करा आणी एक गोळा द्या या गरिबाला. त्यावर भटजी म्हणतो यातील एक ही गोळा तुला देता येणार नाही. कारण हा भात म्हणजे जो दहा दिवसापुर्वी मेला आहे त्या साठी त्याला द्यायचा आहे. म्हातारा तरी ऐकेना म्हातारा म्हणतो तो माणुस आता कुठे आहे. त्यावर भटजी म्हणतो स्वर्गात. लोक ही तेच बोलतात. मग म्हातारा म्हणतो स्वर्ग कुठ आहे. भटजी म्हणतो खुप लांब आहे आणी हे बोलुन सगळे जण त्या म्हातार्याला हाकलून देतात. (दशक्रिया विधी नेहमी ओढ्याच्या किंवा नदीच्या काठावर करतात मग तो म्हातारा शेजारी असलेल्या नदीच्या पाण्यात उतरतो आणी नदीतील पाणी बाहेरच्या जमीनीवर हाताने फेकतो. सुरुवातीला कुणी लक्ष देत नाही पण बराच वेळ झाल्यावर भटजी सह सगळे जण विचारतात ये म्हातार्या आरे काय काय वेड लागलय का काय तुला ? हे काय करतोय?
त्यावर तो म्हातारा दाढी खाजवत म्हणतो “बाप्पा हो यंदा दुष्काळ पडलाय आणि शेताला पाणी नाही म्हणून पाणी देतोय... लोक म्हणतात कुठ आहे शेती तुझी म्हातारा म्हणतो अमरावतीला
लोक म्हणतात कुठ आहे अमरावती? म्हातारा म्हणतो खुप लांब आहे अमरावती लोक आणी भटजी सगळे त्याला हसुन म्हणतात “आरे वेड्या इथुन टाकलेले पाणी तर इथेच तर पडतय आणी कस तुझ्या शेताला पाणी मिळेल. यावर म्हातारा म्हणतो इथ ठेवलेला भात जर मेलेल्या माणसापर्यंत हा भटजी पोचवत असेल तर मी टाकलेल पाणी माझ्या शेताला का मिळणार नाही? हे ऐकल्यावर सगळे लोक चक्रावून जातात. हा भिकारी नसुन कुणीतरी अवलिया आहे हे मान्य
करुन त्या म्हातार्याच्या पायावर डोकं ठेवतात.
हा म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसुन अमरावती जिल्ह्य़ातील डेबुजी झिगंराजी जानोरकर एकही दिवस शाळेत न गेलेला महान विज्ञान वादी #संत_गाडगेबाबा हा होता. वैज्ञानिक विचार करायला शिक्षण लागतेच अस नाही तर आपल्या डोक्यातील मेंदु गहाण न ठेवता स्वतंत्र असावा लागतो.
'अंधश्रध्दा संपली पाहिजे...!

(Forwarded as received)